Wednesday, February 20, 2019

ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा


✍ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, 20 मार्चपर्यंत परीक्षा चालणार.

    राज्यात 2 हजार 957 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार, राज्यातील 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी; मुंबईतील निष्का नरेश हसनगडी या दिव्यांग विद्यार्थिनीला आय-पॅडवर परीक्षा देण्याची मुभा.

🔍 परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून 252 भरारी पथकांची नेमणूक, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाईल बंदी, शिक्षकांनी केंद्र संचालकांकडे मोबाईल जमा करणे बंधनकारक.

💫 *विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :*
▪ परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास आधी उपस्थित राहणे गरजेचे.
▪ परीक्षेसाठी निळा आणि काळा शाईच्या पेन वापरण्यास परवानगी.
▪ परीक्षा केंद्रात मोबाइल अथवा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई.
▪ पेपरची अदलाबदल होऊ नये म्हणून उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोड.
▪ संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथक असणार, चित्रीकरणही होणार.

1 comment:

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर.... गणितचा भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर.... ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला न...