Sunday, February 24, 2019

मुलांनी परिक्षेच्या काळात काय खावं आणि काय टाळावं?

मित्रानो,
           दहावी-बारावीच्या परीक्षा आता  सुरु आहेत. अशा काळात पालकांकडून मुलांवर अनावश्यक बंधने लादली जातात. या गोष्टीचा मुलांवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांनो लक्षात घ्या, मुलांच्या परीक्षांच्या काळात घराचा तुरूंग करू नका. तसेच मुलांनी परिक्षेच्या काळात काय खावं आणि काय टाळावं? याबाबत आज समजून घेऊयात...

🍎मुलांनी काय खावं, काय टाळावं?🍎

1) या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं.

2) दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चार वेळा विभागून थोडं-थोडं खायला द्यावं.

3) मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा.

4) परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत.🍷

5) परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल. 🍩🍪

6) रोज असलेला आहार मुलांना द्यावा.

7) मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत असतील तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा☕ किंवा दूध🍼 देऊ नये. त्याबरोबर फळे 🍇🍋🍐किंवा सुकामेवा 🍚द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी🍪 किंवा बिस्किटं पण चालतील.

8) जर मुलं रात्री अकरानंतर🕚 अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.

9) मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताज-ताजं मुलांना खायला द्यावं.

10) परीक्षेचा काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं 🍶पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावं. फळांच्या ज्यूस पेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.

पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची, सूचनांची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची, संवादाची गरज असते. तसेच आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करत बसू नका. त्यांना प्रेमानं सहकार्य करा, हेच जास्त महत्वाचं आहे.

Friday, February 22, 2019

🌞 उन्हाळ्यात घ्यायची काळजी .🌞

👉 सध्या सगळीकडेच ऊन वाढते आहे आणि आता लवकरच उन्हाळा सुरु होतो आहे. उन्हाळा म्हटलं कि बऱ्याच जणांना त्रास होत असतो. त्यामुळे त्रास झाल्यावर उपाय करण्यापेक्षा आधीच काळजी घेणे महत्वाचे आहे. बघुयात काय काय काळजी घेता येऊ शकते...

▪ उन्हाच्या दिवसात दुपारी 12 ते 3 यावेळेत उन्हात फिरू नका

▪ चहा, कॉफी पिणे शक्यतो टाळा, त्याऐवजी नारळ पाणी प्या.

▪ पूर्ण दिवसभरात पुरेसे पाणी प्या.

▪ प्रवास करताना सोबत पाणी असू द्या.

▪ उन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाऊ नका.

▪ सौम्य रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा.

▪ उन्हात फिरते समयी नेहमी डोळे, डोके आणि त्वचेची काळजी घ्या.

▪ बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन लावूनच बाहेर पडा.

▪ आहारात गुलकंद असू द्या, शरीराला थंडावा मिळेल.

▪ एसी असलेल्या एरियामध्ये काम करणार्‍यांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. अशावेळेस एकदम बाहेर पडू नका, त्रास होऊ शकतो.

Thursday, February 21, 2019

आयुष्य जगायच कधी?

वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू आहे .
25 वर्षे -- नोकरीच्या शोधात आहे.
30 वर्षे -- लग्न करायचं आहे.
35 वर्षे -- मुलं लहान आहेत
40 वर्ष -- थोडं "सेटल" होऊ द्या.
45 वर्षे -- वेळच मिळत नाही हो.
50 वर्षे -- मुलगा / मुलगी दहावीला आहे.
55 वर्ष-- प्रकृती बरी नसते.
60 वर्षे -- मुलामुलींचे लग्न करायची.
65 वर्षे -- ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
70 वर्ष--  मेला.

17 दिवसाच्या आत सर्व प्राँपर्टीवरून तुमचे नाव कमी..

*अरेच्चा
जगायचं राहूनच गेले … !
 
तेंव्हा
आधी जगा ते पण माणुस होऊन आनंदाने ...

आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात

बाकी
सर्व
इथेच
राहणार
आहे .

झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा
*आज मला एक नवीन शिकायला मिळाले.
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले "काय भाव आहे ?
त्यांनी सांगितले  : "120 रूपये  किलो ."
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: " याचा काय भाव आहे "
तो बोलला  : "50 रूपये किलो"
मी विचारले  : " इतका कमी भाव .?
तो बोलला : "साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!!
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे
तेव्हा मला कळाले
जो व्यक्ती  संगठन...समाज आणि  परिवार याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत ...... अर्ध्याहून कमी होते...
कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण परिवार, संघटन आणि मित्र यांच्याशी सतत जोडून रहा...

Wednesday, February 20, 2019

ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा


✍ महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, 20 मार्चपर्यंत परीक्षा चालणार.

    राज्यात 2 हजार 957 परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार, राज्यातील 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी; मुंबईतील निष्का नरेश हसनगडी या दिव्यांग विद्यार्थिनीला आय-पॅडवर परीक्षा देण्याची मुभा.

🔍 परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी मंडळाकडून 252 भरारी पथकांची नेमणूक, परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांसाठी मोबाईल बंदी, शिक्षकांनी केंद्र संचालकांकडे मोबाईल जमा करणे बंधनकारक.

💫 *विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :*
▪ परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास आधी उपस्थित राहणे गरजेचे.
▪ परीक्षेसाठी निळा आणि काळा शाईच्या पेन वापरण्यास परवानगी.
▪ परीक्षा केंद्रात मोबाइल अथवा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई.
▪ पेपरची अदलाबदल होऊ नये म्हणून उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोड.
▪ संवेदनशील परीक्षा केंद्रावर बैठे पथक असणार, चित्रीकरणही होणार.

Wednesday, February 13, 2019

प्रेम

मनापासून ओढ लावतं
       ते प्रेम असत
श्वासात श्वास अडकवून ठेवत
       ते प्रेम असत 
सात जन्म सावली सारख सोबत राहत
       ते प्रेम असत
तीच्यासाठी वेड होऊन जात 
       ते प्रेम असत
तीच्यासाठी काहीही करायला तयार होत
       ते प्रेम असत

               म्हणून म्हणतो प्रेम करा.............

       

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर.... गणितचा भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर.... ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला न...