Friday, March 29, 2019

किल्ले भटकंती

मित्रांनो

            किल्ला म्हटलं की, आपल्या डोळ्या समोर शिवनेरी, प्रतापगड तोरणा या सारखे दिसतात. पण  महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये इतर ही काही किल्ले आहेत. जे पठारावरती किंवा सपाट भू भागावरती बांधण्यात आलेले आहेत. तर आज आशाच एका किल्याची स्थिती जाणून घेऊया.

                      मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामधील अंबेजोगाई या शहराचा स्वतः चा असा इतिहास आहे. पूर्वी या शहराचे नाव मोमिनाबाद असे होते. या ठिकाणी कोकणातील लोकांचे कुलदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. आद्य कवि मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत महाराज यांची समाधी आहे. त्याच बरोबर  बारा जोतिर्लिंगाणं पैकी एक जोतिर्लिंग म्हणजेच वैजनाथ जोतिर्लिंग याच बीड जिल्यातील परळी येथे आहे.आणि या दोनीही तालुक्याच्या ठिकाणा पासून अवग्या 26 किलोमीटर असलेलं धर्मापुरी नावाच एक गाव आहे. या गावामध्ये चालुक्य कालीन केदारेश्वर मंदिर आहे. तसेच एक किल्ला देखील आहे.

 हे गाव अंबेजोगाई – अहमदपूर या मार्गावर वसलेले आहे. 

धर्मापुरीच्या किल्ल्याचा इतिहास :

या किल्ल्यास विशिष्ठ असे नाव नाही. हा किल्ला धर्मापुरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. धर्मापुरीचा हा किल्ला, या गावामध्ये निजामाच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला होता. मराठवाड्यातील या परीसरामध्ये हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. आणि त्यावेळी अंबाजोगाई परिसरात त्याची काही सत्ता केंद्रे होती. अंबाजोगाई येथे निजामाच्या सत्ता केंद्राचे आज ही काही अवशेष दिसून येतात.

धर्मापुरीचा किल्ला ज्या दगडांपासून बांधण्यात आलेला आहे, त्या दगडांवर कोरीव काम केलेले आहे. परिसरात एक मोठा तलाव देखील आहे. धर्मापुरीच्या किल्ल्याचा आणि येथील मंदिरांचा इतिहास रझाकारांशी जोडलेला आहे. असे म्हणतात की, हैद्राबाद मुक्ती संग्रामावेळी रझाकारांनी या परिसरातील काही मंदिरे उध्वस्त केली होती.

धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरातील पहाण्यासारखी ठिकाणे :

अंबाजोगाईहून किंवा परळीहुन धर्मापुरीला आल्यानंतर रस्त्यावरूनच आपल्याला हा किल्ला दिसतो.  

       हा किल्ला धर्मापुरी गावामधील एका उंच वट्यावर बांधलेला आहे. हा उंच वटा दुरूनच आपल्याला दिसतो. तसेच पडझड झालेली किल्ल्याची तटबंदी देखील दिसते. किल्ल्याला ऐकेरी तटबंदी आहे. तटबंदी उंचवट्याच्या खालपासून बांधलेली आहे. तटबंदीमध्ये उभारण्यात आलेले अष्टकोणी बुरुज आहेत. 

 किल्याच्या तटबंदीवर अष्टकोनी बुरूज आहेत, आणि तटबंदीवरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. या जंग्या देखील किल्ल्याच्या बाहेरील बाजूने दिसतात.

किल्याला दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ संरक्षक म्हणून कोट बांधलेले आहेत. या कोटाच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. यापुढे दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच याठिकाणी नक्षीकाम देखील केलेले आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर अवशेषरूपातील खोल्या आहेत. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर एक चौकोनी आकाराची विहिर आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.

हनुमानाचे मंदिर : विहिरीपासून पुढे गेल्यानंतर तटबंदीतील एका दगडावर कोरण्यात आलेले उड्डाण करणाऱ्या हनुमानाचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली एक चोर दरवाजा देखील आहे.

धर्मापुरीचा हा किल्ला निजामशाही सत्तेच्या कालखंडात बांधण्यात आलेला असल्यामुळे किल्ल्याच्या परिसरात एक पीर आहे. किल्ल्याच्या परिसरातील एका बुरुजावर पिराच हे थडगं आहे.

किल्ल्याच्या बाहेरील बाजूस एक तलाव आहे. धर्मापुरी गावातील लोक या तलावाच्या पाण्याचा वापर करतात. जास्त प्रमाणात सांडपाण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.

धर्मापुरी गावाच्या परिसरामध्ये केदारेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या परीसरात काही शिल्प पडलेली आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर देखील शिल्प कोरलेली आहेत. या व्यतिरिक्त धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये काही नागशिल्प आहेत, भवानी देवीचे मंदिर आहे.

शिवनेरी, प्रतापगड, तोरणा या  सारखे आपल्याला ज्ञात असलेले किल्ले आहेत. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अवशेष रूपातील असे काही किल्ले अस्तित्वात आहेत, ज्यांचा इतिहास आपल्याला माहित नाही, अथवा आपल्यापर्यंत पोहचलेला नाही. महाराष्ट्रातील अशा सर्व किल्ल्यांचा इतिहास एकत्र करून, राज्य सरकारने तो सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे.

     रवि तुळशीराम फड

     धर्मापुरी ता परळी जी बीड

     7020139335

Friday, March 8, 2019

💧 गरम पाणी पिण्याचे काय फायदे


▪ गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते.

▪ वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास रोज सकाळी गरम पाण्यासोबत मधाचे सेवन केल्यास खूप मदत होते.

▪ गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार बनण्यास मदत होते.

▪ गरम पाणी प्यायल्याने त्वचा नरम होण्यास मदत होते आणि सोबतच कोंड्यापासून सुटका मिळते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते, केस चमकदार, निरोगी बनतात.

💁‍♀ *महिला दिन आणि बरंच काही!*

दर वर्षी 8 मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. आजघडीला जगभरात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे विशेष सेलिब्रेशन केले जाते. या पार्श्वभूमीवर पहिला महिला दिन कधी साजरा झाला? यंदाची थीम काय? आपली भूमिका काय? आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...   

🧐 *पहिला महिला दिन* :

1909 मध्ये युनाईटेड स्टेट्समध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा केला गेला. मात्र 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. महिला दिनाची पहिली थीम होती- 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.'

🤨 *जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो?* :

1917 साली रशियन महिलांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना मताधिकार देण्यात आला. फेब्रुवारी 1918 साली युके मध्ये 30 महिलांना ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संपत्ती होती त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला.

इतिहासात 1975 हे साल 'Red Letter Year' म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनाईटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला.

💁‍♂ *जागतिक महिला दिन आणि जांभळा रंग यांचं कनेक्शन काय?* :

जांभळ्या रंगाच्या कनेक्शन मागे इतिहास आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चे प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. जांभळा रंग हा 'महिला मुक्तता आंदोलन' याचं देखील प्रतिक आहे. स्त्रियांनी इतिहासात दिलेल्या त्यांच्या अधिकार आणि हक्काच्या लढ्यांमध्ये हाच जांभळा रंग प्रतिकात्मकतेने वापरण्यात आला होता.

❓ *यंदा महिला दिनाची थीम काय?* : 'Think Equal, Build Smart, Innovate for Change या थीमवर आधारित महिला दिनाचे सेलिब्रेशन करताना जांभळा रंग वापरायला विसरू नका.

🎯 *महिला दिन म्हणजे केवळ इव्हेंट नव्हे!* : महिला दिनानिमीत्त केवळ रॅली, कँडलमार्च, किंवा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्याने स्त्रीसबलीकरण होणार नाही. तर स्त्रीमध्ये जागरूकता निर्माण करणे. आपला संघर्ष हा पुरूषांशी नव्हे तर व्यवस्थेशी आहे. याची जाणीव निर्माण करून देणे गरजेचे आहे. अन्यथा महिला दिनाला केवळ एक जागतिक इव्हेंट यापलिकडे काहीही अर्थ राहणार नाही.

🤔 *तुम्ही काय-काय करू शकता?* :

आज आपण घरातील महिलांचा दिवस स्पेशल बनवू शकता. मग ती महिला बायको, आई, सासू, बहीण, मुलगी किंवा इतर कोणी असो. कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात घरापासूनच केली तर अधिकच उत्तम ठरते. तुम्ही काय-काय करू शकता, ते पहा... 

▪ तुमच्या घरातील महिलांना एका दिवस का होईना किचनपासून मुक्ती देऊन पहा. त्यांच्यासाठी चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, लंच तयार करून पहा.
▪ त्यांना फिट राहण्यासाठी प्रेरित करू शकता. कारण घरातील स्त्री फिट असेल तर कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहील.
▪ त्यांना त्यांच्या छंदासाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प करा. मग ते गार्डनिंग, पेंटिंग, म्युझिक, डान्स किंवा इतर काही असो.
▪ दिवसातून त्यांच्या एक तरी कामाची जबाबदारी स्वत: पेलाल असा संकल्प करू शकता.
▪ त्यांनी जीवनात यशाची उंची गाठावी म्हणून प्रेरणादायी पुस्तकेभेट करू शकता.

Thursday, March 7, 2019

🤔 *तुम्हाला माहिती आहे का?*


▪ 1 वर्षात 12 महिने, 365 दिवस, 8760 तास, 525,600 मिनिटे आणि 31,536,000 सेकंद असतात.
▪ 1913 मध्ये ऑलिंपिक ध्वजाचे डिझाईन केले गेले.
▪ एका कागदाचा तुकडा 7 पेक्षा अधिक वेळा फोल्ड केला जाऊ शकत नाही.
▪ आयफेल टॉवरमध्ये 1,792 पायऱ्या आहेत.
▪ गोरिला दिवसात सर्वसाधारणपणे 14 तास झोपतो.
▪ दरवाजावरील डोअर बेलचा शोध 1831 मध्ये लागला. 

📲 भारतात सगळ्यात स्वस्त इंटरनेट📱!

👉 ‘केबलडॉटकोडॉटयूके’ने केलेल्या सर्वेक्षणात इंटरनेट वापरणाऱ्या देशांची माहिती समोर

💫 *जगभरात प्रत्येक जीबीमागे कसे आहेत दर?*
▪ भारत - 0.26 डॉलर (रु.18.20)
▪ अमेरिका - 12.37 डॉलर
▪ ब्रिटन - 6.66 डॉलर
▪ चीन - सरासरी 9.89 डॉलर
▪ झिम्बाब्वे - 75.20 डॉलर (सर्वात महाग)
▪ जागतिक स्तरावर - सरासरी 8.53 डॉलर

🔍 230 विविध देशांमधील डाटा योजनांचा अभ्यास करण्यात आला असून, भारतातील डाटा योजनांचा अभ्यास करण्यासाठी 57 विविध कंपन्यांच्या मोबाइल डाटा योजनांची तपासणी करण्यात आली होती.

*20 लाखांपर्यंत मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीवर आता कर नाही.

👍 2018-19 मध्ये निवृत्त होणाऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणात दिलासा, याआधी 10 लाखांपर्यंत मिळणारी ग्रॅच्युइटी करमुक्त होती आणि आता हीच मर्यादा आता 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

👉 ग्रॅच्युइटी कायद्याअंतर्गत येणाऱ्या नोकरदारांना हा निर्णय लागू होणार, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची ट्विटरवर माहिती

📅 या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येणार हे मात्र अजून स्पष्ट नाही.

Tuesday, March 5, 2019

🤔 *परीक्षा झाल्यावर पुढे काय?*

💫 विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा! या परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच विद्यार्थ्यांना घ्यायचा असतो. हा निर्णय खूप महत्वाचा असतो कारण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी या निर्णयावर अवलंबून असतात आणि मुलांच्या करिअरबाबतीत निर्णय घेताना पालकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे ठरते.

👉 *पालकांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात :*

▪ तुमची एखादी इच्छा अपुरी राहिली म्हणून तुमच्या पाल्याला तसे किंवा तेच करायला भाग पाडू नका. मुलांच्या कलाने घ्या, त्यांना कशात रस आहे ते ओळख आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा.

▪ दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढती आहे, त्यामुळे मुलांचा एखाद्या विषयातला रस आणि त्यात करिअर केल्याने कितपत पैसे मिळू शकतो याचा विचार अवश्य व्हायला हवा.

▪ मुलांना निर्णय घेण्यात मदत करतेवेळी पुढच्या किमान पाच ते दहा वर्षांचा विचार करून मार्ग दाखवा.

▪ सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना धीर द्या, ते एका नव्या जगात प्रवेश करत असताना त्यांना पालकांनी मदत करणे महत्वाचे ठरते.
          
                          आवडल्यास रिप्लाय नक्की द्या

Friday, March 1, 2019

✍ *ऑल द बेस्ट! दहावीची आजपासून परीक्षा*

📍 पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत उद्यापासून दहावीची परीक्षा होणार, जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शेवटची संधी

🔍 राज्यभरातील 4 हजार 874 केंद्रांवर परीक्षा होणार, संपूर्ण राज्यभरातून 17 लाख 813 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी, कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी 252 भरारी पथके असणार

💫 *विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे :*
▪ परीक्षा केंद्रात मोबाइल नेऊ नका
▪ विद्यार्थ्यांनी वेळेआधी अर्धा तास परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक
▪ दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना शाई बदल करू नका
▪ उत्तरपत्रिकांची पाने जपून हाताळा
▪ उत्तरपत्रिकांवर उत्तराशिवाय इतर कोणताही मजकूर लिहू नका
▪ चुकीच्या गोष्टी समोर आल्यास विद्यार्थ्यांची गंभीर चूक समजून त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असा परीक्षा मंडळातर्फे इशारा.

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर.... गणितचा भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर.... ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला न...