Saturday, August 31, 2019

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक
लाभला नसता तर....
गणितचा भूगोल झाला असता.

फळ्यावर जर खडूचा हात
फिरवला नसता तर....
ABCD आणि बाराखडीचा
अर्थच कळला नसता.

गुरुजी तुम्हीच आकार दिला जेव्हा....
मातीचा मी गोळा होतो.
पायथागोरस, आर्किमिडीज, न्यूटन
अजून हि तोंडपाठ आहे गुरुजी....

तुम्ही शिकवलेल्य पाण्याच्या रेणुसूत्रात
मला तुम्हीच दिसता गुरुजी....

तुमच्या हातून खाल्लेला मार
आज पर्यंत विसरलो नाही मी....
घोडा करून उभे करायचाच तुम्ही
आता तीच पद्धत व्यायामाला वापरतो मी....

शाळा चुकवायचो कित्येकदा
उनाडक्या करताना....
पण भीती वाटायची
तुम्ही गृहपाठ तपासतांना....

आज मात्र तुम्ही whatsapp/facebook वर चेष्टेचा विषय झाला....

मास्तर कोमात
गुरुजी जोमात
मास्तर पळाला
यात्रेला गेला
असल्या कॉमेन्ट जेव्हा लोक करतात.

काळीज फाटते हो गुरुजी
आमच्या आदर्शाचे मातेरे होताना.

पण तुमची प्रतिमा मात्र
माझ्या ह्रदयात आदरणीयच राहील....
मी साक्षर फक्त तुमच्या मुळे झालो
हि जाणीव मला शेवतोपर्यंत राहील....

                   
             

Saturday, May 11, 2019

🤖 आज राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस


आज राष्ट्रीय ‘तंत्रज्ञान दिवस’. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. तंत्रज्ञान विकसनामुळे मानवाचे जीवन अधिक सोयीस्कर बनत चालले आहे. पण हा दिवस आजच्या दिवशी का साजरा करतात? याबद्दल जाणून घेऊयात...

आजच्या दिवशी 11 मे 1998 रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि मृत माजी राष्ट्रपती डाॅॅ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती- 1 या आण्विक क्षेपणास्त्रााची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून 11 मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन माजी पंत्रप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून घोषित केला. भारतात 1999 सालीपासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.

Friday, April 12, 2019

कडक उन्हाळा; काय करावे आणि काय करू नये?


आता उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे काही आजार डोके वर काढण्याची शक्यता असते. अशात आनंदी व निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात... 

📍 *काय करावे?* :

1. सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे 2-2 थेंब नाकात घालावेत. यामुळे डोकं आणि डोळ्यांतील उष्णता शमते.

2. सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदूळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा.

3. सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची चप्पल वापरु नयेत.

4. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावं. डोकं आणि डोळ्यांचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा.

5. फ्रिज किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे साधं अथवा माठातील पाणी प्यावं.

6. जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेंदी लावावी.

📍 *काय करू नये?* :

1. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

2. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

3. खमंग, कोरडं, शिळं, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसंच आमचूर, लोणचं, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ खाणं टाळावं.

4. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावं.

5. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 10-15 मिनिटांनंतरच पाणी प्यावं.

6. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणं आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

Friday, March 29, 2019

किल्ले भटकंती

मित्रांनो

            किल्ला म्हटलं की, आपल्या डोळ्या समोर शिवनेरी, प्रतापगड तोरणा या सारखे दिसतात. पण  महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये इतर ही काही किल्ले आहेत. जे पठारावरती किंवा सपाट भू भागावरती बांधण्यात आलेले आहेत. तर आज आशाच एका किल्याची स्थिती जाणून घेऊया.

                      मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामधील अंबेजोगाई या शहराचा स्वतः चा असा इतिहास आहे. पूर्वी या शहराचे नाव मोमिनाबाद असे होते. या ठिकाणी कोकणातील लोकांचे कुलदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. आद्य कवि मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत महाराज यांची समाधी आहे. त्याच बरोबर  बारा जोतिर्लिंगाणं पैकी एक जोतिर्लिंग म्हणजेच वैजनाथ जोतिर्लिंग याच बीड जिल्यातील परळी येथे आहे.आणि या दोनीही तालुक्याच्या ठिकाणा पासून अवग्या 26 किलोमीटर असलेलं धर्मापुरी नावाच एक गाव आहे. या गावामध्ये चालुक्य कालीन केदारेश्वर मंदिर आहे. तसेच एक किल्ला देखील आहे.

 हे गाव अंबेजोगाई – अहमदपूर या मार्गावर वसलेले आहे. 

धर्मापुरीच्या किल्ल्याचा इतिहास :

या किल्ल्यास विशिष्ठ असे नाव नाही. हा किल्ला धर्मापुरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. धर्मापुरीचा हा किल्ला, या गावामध्ये निजामाच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला होता. मराठवाड्यातील या परीसरामध्ये हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. आणि त्यावेळी अंबाजोगाई परिसरात त्याची काही सत्ता केंद्रे होती. अंबाजोगाई येथे निजामाच्या सत्ता केंद्राचे आज ही काही अवशेष दिसून येतात.

धर्मापुरीचा किल्ला ज्या दगडांपासून बांधण्यात आलेला आहे, त्या दगडांवर कोरीव काम केलेले आहे. परिसरात एक मोठा तलाव देखील आहे. धर्मापुरीच्या किल्ल्याचा आणि येथील मंदिरांचा इतिहास रझाकारांशी जोडलेला आहे. असे म्हणतात की, हैद्राबाद मुक्ती संग्रामावेळी रझाकारांनी या परिसरातील काही मंदिरे उध्वस्त केली होती.

धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरातील पहाण्यासारखी ठिकाणे :

अंबाजोगाईहून किंवा परळीहुन धर्मापुरीला आल्यानंतर रस्त्यावरूनच आपल्याला हा किल्ला दिसतो.  

       हा किल्ला धर्मापुरी गावामधील एका उंच वट्यावर बांधलेला आहे. हा उंच वटा दुरूनच आपल्याला दिसतो. तसेच पडझड झालेली किल्ल्याची तटबंदी देखील दिसते. किल्ल्याला ऐकेरी तटबंदी आहे. तटबंदी उंचवट्याच्या खालपासून बांधलेली आहे. तटबंदीमध्ये उभारण्यात आलेले अष्टकोणी बुरुज आहेत. 

 किल्याच्या तटबंदीवर अष्टकोनी बुरूज आहेत, आणि तटबंदीवरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. या जंग्या देखील किल्ल्याच्या बाहेरील बाजूने दिसतात.

किल्याला दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ संरक्षक म्हणून कोट बांधलेले आहेत. या कोटाच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. यापुढे दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच याठिकाणी नक्षीकाम देखील केलेले आहे. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर अवशेषरूपातील खोल्या आहेत. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर एक चौकोनी आकाराची विहिर आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.

हनुमानाचे मंदिर : विहिरीपासून पुढे गेल्यानंतर तटबंदीतील एका दगडावर कोरण्यात आलेले उड्डाण करणाऱ्या हनुमानाचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली एक चोर दरवाजा देखील आहे.

धर्मापुरीचा हा किल्ला निजामशाही सत्तेच्या कालखंडात बांधण्यात आलेला असल्यामुळे किल्ल्याच्या परिसरात एक पीर आहे. किल्ल्याच्या परिसरातील एका बुरुजावर पिराच हे थडगं आहे.

किल्ल्याच्या बाहेरील बाजूस एक तलाव आहे. धर्मापुरी गावातील लोक या तलावाच्या पाण्याचा वापर करतात. जास्त प्रमाणात सांडपाण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.

धर्मापुरी गावाच्या परिसरामध्ये केदारेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या परीसरात काही शिल्प पडलेली आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर देखील शिल्प कोरलेली आहेत. या व्यतिरिक्त धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये काही नागशिल्प आहेत, भवानी देवीचे मंदिर आहे.

शिवनेरी, प्रतापगड, तोरणा या  सारखे आपल्याला ज्ञात असलेले किल्ले आहेत. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अवशेष रूपातील असे काही किल्ले अस्तित्वात आहेत, ज्यांचा इतिहास आपल्याला माहित नाही, अथवा आपल्यापर्यंत पोहचलेला नाही. महाराष्ट्रातील अशा सर्व किल्ल्यांचा इतिहास एकत्र करून, राज्य सरकारने तो सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे.

     रवि तुळशीराम फड

     धर्मापुरी ता परळी जी बीड

     7020139335

Friday, March 8, 2019

💧 गरम पाणी पिण्याचे काय फायदे


▪ गरम पाणी प्यायल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात आणि पचनक्रिया सुधारते.

▪ वजन नियंत्रणात ठेवायचे असल्यास रोज सकाळी गरम पाण्यासोबत मधाचे सेवन केल्यास खूप मदत होते.

▪ गरम पाणी प्यायल्याने शरीरातील अशुद्ध पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा चमकदार बनण्यास मदत होते.

▪ गरम पाणी प्यायल्याने त्वचा नरम होण्यास मदत होते आणि सोबतच कोंड्यापासून सुटका मिळते आणि त्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते, केस चमकदार, निरोगी बनतात.

💁‍♀ *महिला दिन आणि बरंच काही!*

दर वर्षी 8 मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. आजघडीला जगभरात महिलांप्रती प्रेम, आदर व्यक्त करत या दिवसाचे विशेष सेलिब्रेशन केले जाते. या पार्श्वभूमीवर पहिला महिला दिन कधी साजरा झाला? यंदाची थीम काय? आपली भूमिका काय? आज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात...   

🧐 *पहिला महिला दिन* :

1909 मध्ये युनाईटेड स्टेट्समध्ये पहिला राष्ट्रीय महिला दिवस 28 फेब्रुवारीला साजरा केला गेला. मात्र 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरु केली. महिला दिनाची पहिली थीम होती- 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर.'

🤨 *जागतिक महिला दिन 8 मार्चला का साजरा केला जातो?* :

1917 साली रशियन महिलांनी केलेल्या निषेधानंतर त्यांना मताधिकार देण्यात आला. फेब्रुवारी 1918 साली युके मध्ये 30 महिलांना ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची संपत्ती होती त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला.

इतिहासात 1975 हे साल 'Red Letter Year' म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनाईटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर 8 मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला.

💁‍♂ *जागतिक महिला दिन आणि जांभळा रंग यांचं कनेक्शन काय?* :

जांभळ्या रंगाच्या कनेक्शन मागे इतिहास आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चे प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. जांभळा रंग हा 'महिला मुक्तता आंदोलन' याचं देखील प्रतिक आहे. स्त्रियांनी इतिहासात दिलेल्या त्यांच्या अधिकार आणि हक्काच्या लढ्यांमध्ये हाच जांभळा रंग प्रतिकात्मकतेने वापरण्यात आला होता.

❓ *यंदा महिला दिनाची थीम काय?* : 'Think Equal, Build Smart, Innovate for Change या थीमवर आधारित महिला दिनाचे सेलिब्रेशन करताना जांभळा रंग वापरायला विसरू नका.

🎯 *महिला दिन म्हणजे केवळ इव्हेंट नव्हे!* : महिला दिनानिमीत्त केवळ रॅली, कँडलमार्च, किंवा सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्याने स्त्रीसबलीकरण होणार नाही. तर स्त्रीमध्ये जागरूकता निर्माण करणे. आपला संघर्ष हा पुरूषांशी नव्हे तर व्यवस्थेशी आहे. याची जाणीव निर्माण करून देणे गरजेचे आहे. अन्यथा महिला दिनाला केवळ एक जागतिक इव्हेंट यापलिकडे काहीही अर्थ राहणार नाही.

🤔 *तुम्ही काय-काय करू शकता?* :

आज आपण घरातील महिलांचा दिवस स्पेशल बनवू शकता. मग ती महिला बायको, आई, सासू, बहीण, मुलगी किंवा इतर कोणी असो. कारण कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात घरापासूनच केली तर अधिकच उत्तम ठरते. तुम्ही काय-काय करू शकता, ते पहा... 

▪ तुमच्या घरातील महिलांना एका दिवस का होईना किचनपासून मुक्ती देऊन पहा. त्यांच्यासाठी चहा, कॉफी, ब्रेकफास्ट, लंच तयार करून पहा.
▪ त्यांना फिट राहण्यासाठी प्रेरित करू शकता. कारण घरातील स्त्री फिट असेल तर कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहील.
▪ त्यांना त्यांच्या छंदासाठी प्रोत्साहित करण्याचा संकल्प करा. मग ते गार्डनिंग, पेंटिंग, म्युझिक, डान्स किंवा इतर काही असो.
▪ दिवसातून त्यांच्या एक तरी कामाची जबाबदारी स्वत: पेलाल असा संकल्प करू शकता.
▪ त्यांनी जीवनात यशाची उंची गाठावी म्हणून प्रेरणादायी पुस्तकेभेट करू शकता.

Thursday, March 7, 2019

🤔 *तुम्हाला माहिती आहे का?*


▪ 1 वर्षात 12 महिने, 365 दिवस, 8760 तास, 525,600 मिनिटे आणि 31,536,000 सेकंद असतात.
▪ 1913 मध्ये ऑलिंपिक ध्वजाचे डिझाईन केले गेले.
▪ एका कागदाचा तुकडा 7 पेक्षा अधिक वेळा फोल्ड केला जाऊ शकत नाही.
▪ आयफेल टॉवरमध्ये 1,792 पायऱ्या आहेत.
▪ गोरिला दिवसात सर्वसाधारणपणे 14 तास झोपतो.
▪ दरवाजावरील डोअर बेलचा शोध 1831 मध्ये लागला. 

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर.... गणितचा भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर.... ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला न...