Sunday, February 24, 2019

मुलांनी परिक्षेच्या काळात काय खावं आणि काय टाळावं?

मित्रानो,
           दहावी-बारावीच्या परीक्षा आता  सुरु आहेत. अशा काळात पालकांकडून मुलांवर अनावश्यक बंधने लादली जातात. या गोष्टीचा मुलांवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे पालकांनो लक्षात घ्या, मुलांच्या परीक्षांच्या काळात घराचा तुरूंग करू नका. तसेच मुलांनी परिक्षेच्या काळात काय खावं आणि काय टाळावं? याबाबत आज समजून घेऊयात...

🍎मुलांनी काय खावं, काय टाळावं?🍎

1) या काळात काही मुलांना खूप भूक लागते, तर काही मुलं काहीच खात नाही. ही दोन्ही त्यांच्यावरील अतिताणाची लक्षणं आहे. त्यापेक्षा अभ्यासाच्या वेळेत त्यांना विशिष्ट अंतरानं खायला द्यावं.

2) दिवसातून दोनच वेळा मुलांना पोटभर जेवायला न देता चार वेळा विभागून थोडं-थोडं खायला द्यावं.

3) मधल्या वेळेच्या खाण्यात त्यांना फळं, सुकामेवा खाण्यास द्यावा.

4) परीक्षेला जाण्याआधी त्यांना लिंबू सरबत.🍷

5) परीक्षेवरून आल्यावर त्यांना धपाटे, धिरडे असा थोडा चटकदार खाऊ दिला तरी चालेल. 🍩🍪

6) रोज असलेला आहार मुलांना द्यावा.

7) मुलं पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसत असतील तर पहाटे उठल्यावर त्यांना नुसताच चहा☕ किंवा दूध🍼 देऊ नये. त्याबरोबर फळे 🍇🍋🍐किंवा सुकामेवा 🍚द्यावा. हे दोन्ही नसतील तर पोळी🍪 किंवा बिस्किटं पण चालतील.

8) जर मुलं रात्री अकरानंतर🕚 अभ्यास करत असतील तर रात्री नुसताच चहा न देता थोडं खायलाही द्यावं. नुसत्या चहानं मुलांना पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते.

9) मुलांना परीक्षेच्या काळात बाहेरचं किंवा जंक फूड, फास्ट फूड देऊ नये. आपल्या हातानं बनवलेलं ताज-ताजं मुलांना खायला द्यावं.

10) परीक्षेचा काळ म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ असतो. त्यांच्या शरीरात पुरेसं 🍶पाणी जाण्याची आवश्यकता असते. तेव्हा थोड्या-थोड्या वेळानं त्यांना पाणी प्यायला द्यावं. मधून-मधून सरबत द्यावं. फळांच्या ज्यूस पेक्षा लिंबाच्या सरबताला प्राधान्य द्यावं.

पालकांनो, परीक्षेच्या काळात मुलांना तुमच्याकडून शिस्तीची, सूचनांची किंवा तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर तुमच्या सहकार्याची, संवादाची गरज असते. तसेच आपल्या मुलांची इतर मुलांशी तुलना करत बसू नका. त्यांना प्रेमानं सहकार्य करा, हेच जास्त महत्वाचं आहे.

No comments:

Post a Comment

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर.... गणितचा भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर.... ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला न...